पुणे: प्लॅस्टिकमुक्त अभियान: अमजदभाई मगदूम यांच्याकडून नागपूर चाळ येथे कापडी पिशव्यांचे वाटप

येरवडा (प्रतिनिधी): प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने, मगदूम फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष जनसेवक अमजदभाई मगदूम यांनी नागपूर चाळ, येरवडा परिसरात प्लास्टिकमुक्त अभियान राबवले. या अभियानाअंतर्गत परिसरातील नागरिकांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
या अभियानात मगदूम फ्रेंड सर्कलचे सदस्य घनश्याम पंचमुख, जमीर सय्यद, अरबाज शेख, शैबाज सय्यद, शारुख शेख, रेहान शेख, पप्पू मर्चंडे, आशिष उगाडे, साहिल सय्यद, सलमान शेख, सचिन शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे नुकसान
प्लास्टिकमुळे नद्या, नाल्या, ओढे आणि जमीन प्रदूषित होतात, तसेच प्लास्टिक जाळल्यास हवा विषारी होते. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. यासाठी प्लास्टिकचा वापर थांबवण्याचे आवाहन जनसेवक अमजदभाई मगदूम यांनी केले.
नागरिकांमध्ये जनजागृतीचे महत्त्व
प्लास्टिकच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “प्लास्टिकमुक्त परिसर ही संकल्पना सर्वांनी राबवावी आणि पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे,” असे आवाहन मगदूम यांनी केले.
या अभियानामुळे परिसरातील नागरिकांनी प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संकल्प केला आहे.