मोदींच्या वाढदिवसानिमित्त वडगाव शेरीत ‘एक दिवा जनतेच्या प्रश्नांसाठी’ उपक्रम १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रश्नांकडे लक्ष वेधणार

0

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने…

Spread the love
IMG-20260917-WA0028

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात ‘एक दिवा जनतेच्या प्रश्नांसाठी’ हा आठवडाभराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान संपूर्ण मतदारसंघात हा उपक्रम होणार असून, विविध भागांतील नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उपक्रमाची माहिती आम आदमी पार्टीच्या पुणे शहर शिक्षक आघाडीच्या शहराध्यक्ष शितल विश्वनाथ कांडेलकर यांनी दिली. उपक्रमादरम्यान वडगाव शेरी मतदारसंघातील विविध भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. नागरिकांकडून त्यांच्या परिसरातील प्रमुख समस्या जाणून घेऊन त्या प्रश्नांना प्रतीकात्मक स्वरूपात दिव्यांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणले जाणार आहे.

पाणीपुरवठा, टँकर, कचरा, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण, बेरोजगारी, वाहतूक कोंडी तसेच अनधिकृत होर्डिंग्ज यांसारख्या प्रश्नांवर नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. संबंधित परिसरातील महत्त्वाचा प्रश्न कोणता, याबाबत नागरिकांशी चर्चा करून त्यावर सार्वजनिक लक्ष वेधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

“दिवा हा केवळ प्रकाश देणारे माध्यम नसून एखाद्या प्रश्नाकडे समाजाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रतीक आहे. प्रत्येक भागातील नागरिकांचा महत्त्वाचा प्रश्न जाणून घेऊन तो दिव्यांच्या उजेडात प्रकाशझोतात आणण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे कांडेलकर यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, “वाढदिवस साजरा करताना केवळ उत्सव आणि शुभेच्छांपुरते मर्यादित न राहता जनतेच्या प्रश्नांवरही चर्चा व्हावी, ही आमची भूमिका आहे. विकासाचे दिवे पेटत असतील तर त्यांचा प्रकाश सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवरही पडायला हवा.”

नागरिकांनी आपल्या परिसरातील महत्त्वाचे प्रश्न मांडावेत आणि ते प्रश्न सार्वजनिक चर्चेत आणण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

उपक्रमाचा कालावधी : १७ ते २३ सप्टेंबर २०२६
स्थळ : संपूर्ण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ

Spread the love

Leave a Reply

You may have missed