वारजे जकात नाक्यावर ‘केबलचा फास’; प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

0
20260812_113804AMByGPSMapCamera

पुणे:१२ऑगस्ट-वारजे जकात नाका, तिरुपती नगर रस्त्यावरील मुख्य चौकात दत्त मंदिरासमोर आणि रिक्षा स्टॅण्डजवळ लोंबकळणारी केबल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची ठरत असल्याची तक्रार आहे.
रस्त्यावर अशा प्रकारे लोंबकळणाऱ्या केबलमुळे पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना अडथळा व अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. गर्दीच्या चौकात एखाद्या पादचारी किंवा दुचाकीस्वाराच्या गळ्यात केबल अडकून गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
इंटरनेट, केबल टीव्ही आणि दूरसंचार सेवांसाठी टाकण्यात आलेल्या केबल्सची योग्य देखभाल आणि व्यवस्थापन न झाल्याने शहरातील अनेक भागांत लोंबकळणाऱ्या केबल्सचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या धोकादायक केबलची तातडीने पाहणी करून ती सुरक्षित पद्धतीने हटवावी तसेच निष्काळजीपणासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाकडून ठोस कारवाई कधी होणार? नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होण्याची प्रशासन वाट पाहणार का?

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com⁠�
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply