मार्केट यार्ड : ड्रॅगन फ्रूटला उच्चांकी भाव; २०१ रुपये किलो दराने विक्री

0
IMG_20260811_135950

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – मार्केट यार्डातील किसन सिताराम ब्रदर्स, गाळा क्रमांक ४७६ येथे विक्रीसाठी आणलेल्या ड्रॅगन फ्रूटला तब्बल २०१ रुपये किलो असा उच्चांकी भाव मिळाला. विशाल सोमनाथ परदेशी यांनी खरेदी करून आणलेल्या या मालाची बाजारात २०१ रुपये किलो दराने विक्री करण्यात आली.



ड्रॅगन फ्रूटला मिळालेल्या या चांगल्या दरामुळे उत्पादक तसेच व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाजारातील आवक, दर्जा आणि मागणी यानुसार फळभाज्या व फळांच्या दरामध्ये चढ-उतार होत असतात. त्यातच उत्तम दर्जाच्या ड्रॅगन फ्रूटला २०१ रुपये किलोचा भाव मिळाल्याने हा व्यवहार चर्चेचा विषय ठरला आहे.

मार्केट यार्डातील व्यापारी आणि ग्राहकांकडूनही ड्रॅगन फ्रूटच्या दराकडे लक्ष दिले जात आहे.

Spread the love

Leave a Reply