पुण्यात स्वारगेट बस स्थानकाची ठाकरे गटाकडून तोडफोड, वसंत मोरे आक्रमक – व्हिडिओ वायरल

Vasant-more-2025-02-ba624d266bcfb8ee0ee405892144e06b-3x2.jpg

स्वारगेट बस डेपोतील संतापजनक घटना: २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भल्या पहाटे ५.३० वाजता घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आक्रमक झाली असून, नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस डेपो गाठले. संतप्त कार्यकर्त्यांसह त्यांनी डेपो तसेच बसची तोडफोड केली. “ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, याचा आम्ही पाठपुरावा करू. शिवसेना स्टाईलने याचे उत्तर दिले जाईल,” असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.

पहा व्हिडिओ



दरम्यान, ज्या शिवशाही बसमध्ये हा अत्याचार घडला, ती बस दुसऱ्या डेपोची असल्याची माहिती समोर आली आहे. या बसच्या सुरक्षेतील त्रुटी अधिकच धक्कादायक आहेत. बसच्या दरवाजाला कुठलाही लॉक नव्हता आणि केबिनच्या दरवाजालाही फक्त दोरी बांधलेली होती. यामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Spread the love