दुधनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा एल्गार

IMG-20250227-WA0032.jpg

सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगरपरिषदेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करावा, अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.

दुधनी नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी श्री. आतिश वाळूंज यांची बदली होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे, मात्र अद्याप येथे नवा मुख्याधिकारी नेमण्यात आलेला नाही. सध्या अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. रमाकांत डाके यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मात्र, दुधनी शहराचा वेगाने होणारा विकास आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे एकाच अधिकाऱ्याद्वारे दोन्ही नगरपरिषदांचे कार्यकाज प्रभावीपणे पार पाडणे कठीण झाले आहे.

मुख्याधिकारी नसल्याने दुधनी शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, सफाई व्यवस्थापन अपूर्ण राहणे, गटार व सांडपाणी व्यवस्थापन निकृष्ट स्थितीत असणे, पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा न होणे तसेच मंजूर विकासकामे वेळेत पूर्ण न होणे यांसारख्या अडचणी शहरवासीयांना भेडसावत आहेत.

या परिस्थितीवर त्वरित तोडगा काढावा आणि दुधनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची स्वतंत्र व कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मा. सैदप्पा झळकी,दुधनी चे माजी उपनगराध्यक्ष विजयकुमार मानकर शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, मुस्लिम आघाडी शहराध्यक्ष महेदिमिया जिडगे आणि संतोष जन्ना  यांनी केली आहे. अन्यथा, नगरपरिषद कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या निवेदनाची प्रत जिल्हा प्रशासन अधिकारी तसेच केंद्रीय राज्यमंत्री मा. रामदास आठवले यांना देखील पाठवण्यात आली आहे. आता प्रशासन या मागणीवर

Spread the love

You may have missed