येरवडा तारकेश्वर ब्रीजवर भगदाड; वाहतूक कोलमडली; प्रशासन झोपले; पुणेकर मात्र अडकले! – पहा व्हिडिओ

0
IMG_20250509_214618.jpg

पुणे, 9 मे 2025 – येरवडा येथील तारकेश्वर ब्रीजवर आज सकाळी पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे दुरुस्तीच्या कामासाठी एक लेन बंद करण्यात आली. त्यामुळे शादल बाबा दर्गा दुर्गामाता रोड, नगर रोड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी 6.30 वाजेनंतर, कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली. पर्णकुटी चौक ते येरवडा दरम्यान हजारो वाहनचालक कोंडीत अडकले होते. काही नागरिकांना कामावरही जाता आले नाही, अशी माहिती समोर आली आहे.

पहा व्हिडिओ

या गोंधळात वाहतूक पोलीस आणि वाहतूक वार्डन कुठेच दृश्य नव्हते. ‘महाराष्ट्र माझा’च्या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली असता, वाहतूक पोलीस शेजारील वॉकिंग प्लाझा येथे गप्पा मारताना आढळले, तर चौकात वाहतूक नियोजन पूर्णतः विस्कळीत दिसले.

सामाजिक कार्यकर्ते गणेश घायमुक्ते यांनी प्रशासनाकडे लक्ष वेधले असून, तत्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांचे रोजचे आयुष्य अधिकाधिक विस्कळीत होण्याचा धोका आहे.


Spread the love

Leave a Reply