पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; १६ एप्रिलचा पाणीपुरवठा बंद पुढे ढकलला

pudharinews_2025-03-08_t5jolqo7_12.jpg

पुणे: टँकर संप तसेच काही तांत्रिक कारणांमुळे गुरुवार, दिनांक १६ एप्रिल रोजी नियोजित करण्यात आलेला पाणीपुरवठा बंद (क्लोजर) पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून, शहरातील पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे नियमित सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही.

दरम्यान, पुढील पाणीपुरवठा बंदाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

You may have missed