पुणे: गांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक: गुन्हे शाखेची पुण्यात कारवाई

1002906267.jpg

पुणे: छत्रपती शिवाजी रस्ता परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची बाजारमूल्य सुमारे ७,५५० रुपये असल्याचे समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये समाधान केदा पवार (वय ३३, लोहनेर, ता. देवळा, जि. नाशिक) आणि संदीप सखाराम खैरनार (वय ३८, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांचा समावेश आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून गुन्हे शाखेचे युनिट एक सतर्क होते.

गुन्हे शाखेच्या पथकाने खडक एसपीटी मार्शलवरील पोलीस अंमलदार सुजय रिसबुड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली. शुक्रवार पेठेमध्ये सुशील लॉजसमोर दोन संशयित दुचाकीसह थांबलेले आढळून आले. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून ८२० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल, आणि दुचाकीसह ४७,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये विठ्ठल साळुंके, शुभम देसाई, सुजय रिसबुड, रफीक मुल्ला, महेश कुंदे, शशी गाडे, आणि अजित शिंदे यांचा समावेश होता.

या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Spread the love