विद्यार्थी-पालकांसाठी करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक साहित्य वाटप शिबिर उत्साहात

0
IMG-20260603-WA0035

पुणे, दि. ३ जून : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना शिक्षण व करिअरच्या क्षेत्रात योग्य दिशा मिळावी या उद्देशाने Cultivating Minds Social Organization आणि आम्ही भारताचे लोक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन तसेच शैक्षणिक साहित्य वाटप शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध संधी, करिअरचे पर्याय, कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कायदेशीर जागरूकता, कौशल्य विकास तसेच यशस्वी जीवनासाठी आवश्यक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्यात आले.

या कार्यक्रमास अॅड. निखिल सर, रेश्मा ताई, कोतल ताई, अन्वर शेख, निलेश सर, इस्माईल शेख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक यशाबरोबरच आत्मविश्वास, नेतृत्वगुण, कौशल्य विकास आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदविला. या शिबिरामुळे भविष्यातील शैक्षणिक व करिअरविषयक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले. अशा उपक्रमांमुळे सक्षम, सुजाण आणि जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Spread the love

Leave a Reply