लाडक्या बहिणींसाठी सुवर्णसंधी! साध्या कागदावर अर्ज करा; गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर करा आणि मिळवा तीन मोफत सिलिंडर

गॅस कनेक्शनच्या नावामुळे अन्नपूर्णा योजनेपासून महिलांवर अन्याय
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अनेक कुटुंबांमध्ये गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर असल्याने हजारो महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख शिधापत्रिकाधारकांपैकी सुमारे एक लाख महिलांना योजनेचा लाभ घेता आलेला नाही. योजनेनुसार, लाभार्थी महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे.
कनेक्शन बदलण्यासाठी सोपी प्रक्रिया
या समस्येच्या समाधानासाठी शासनाने उपाययोजना सुचवली आहे. महिलांनी आपल्या गॅस एजन्सीकडे साध्या कागदावर अर्ज करून, आधारकार्डाची प्रत जोडून कनेक्शन आपल्या नावावर करून घ्यावे. ही प्रक्रिया सोपी असून, संबंधित एजन्सी नाव बदलण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
लाभाची प्रक्रिया:
गॅस कनेक्शन महिलेच्या नावे झाल्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहेत. सुरुवातीला लाभार्थीने पूर्ण रक्कम भरावी लागेल, परंतु काही दिवसांत शासनाचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा होईल.
महिला पुढाकार घ्या!
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी महिलांना गॅस कनेक्शन त्यांच्या नावावर करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांच्या हितासाठी आहे. महिलांनी गॅस एजन्सीकडे त्वरित अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा,” असे सरडे यांनी सांगितले.
महिलांच्या नावावर कनेक्शन नसल्यामुळे योजनेंतर्गत लाभ घेताना अडथळे येत आहेत, पण शासनाच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
जर कुठलीही कंपनी, भारत गॅस, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन गॅस, किंवा एजन्सी मालक सुविधा देत नसेल तर या नंबर वर संपर्क करा.
महाराष्ट्र माझा न्युज.
ईमेल ऍड्रेस. Maharashtramajha online00@gmail.com
मोबाईल – 9326424200
मुख्य संपादक : मोईन चौधरी