दुधनी: जि.प. मराठी केंद्र शाळा व कन्नड मुलांच्या शाळेचा संयुक्त वनभोजन उत्सव दणक्यात संपन्न

अक्कलकोट (प्रतिनिधी: सैदप्पा झळकी)
दुधनी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक केंद्र शाळा आणि कन्नड मुलांच्या शाळेने एकत्रितपणे आयोजित केलेला वनभोजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम सुप्रसिद्ध व्यापारी आणि प्रगतिशील शेतकरी श्री. राजकुमार सोळसे सावकार यांच्या शेतामध्ये संपन्न झाला.
सकाळी परिपाठानंतर दोन्ही शाळांचे विद्यार्थी रांगेतून शेताकडे रवाना झाले. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या राजू सोळसे यांनी मुलांसाठी स्वच्छ आणि सुंदर जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी मुलांना शेतातील पिके, वृक्ष आणि वनस्पती यांची माहिती दिली.
पहा व्हिडिओ
कार्यक्रमाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल झाली. श्री. सुभाष अतनूरे आणि महांतेश कर सर यांच्या सुमधुर गीतांनी आणि मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीशैल मलगण यांच्या नृत्याने कार्यक्रमाला रंगत आणली. विद्यार्थ्यांनीही नृत्य, गायन यांसारख्या कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
दिवसभर चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद घेतला. कार्यक्रमात कन्नड शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय टोणगे, श्री. सिध्दाराम गोरे, श्री. बसवराज मंत्री, श्री. सुहास पवार यांसह इतर शिक्षक आणि शिक्षिकांनी आपले मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. पोमू राठोड यांनी सर्वांचे आभार मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच निसर्गाशी नाळ जुळवणारा ठरला.