दरवाढीने खाद्य व्यवसाय संकटात; वडापाव-समोशाचे दर वाढण्याची शक्यता; आर्थिक गणित कोलमडले

0
n706908149177891350952240a5acd9aff7084aaeed4da528ef5de493c76ef013c3a907ab9d9a5881ee2201

पुणे, शहर प्रतिनिधी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढ होत असल्याने लघु खाद्य व्यावसायिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. मार्चपासून चौथ्यांदा दरवाढ झाल्यानंतर व्यावसायिक सिलिंडरचा दर तब्बल ३१०० रुपयांवर पोहोचला असून, छोट्या हॉटेल व्यावसायिकांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

महागाईमुळे आधीच खाद्यतेल, बेसन, बटाटे, कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच गॅस दरवाढ झाल्याने चहा, वडापाव, समोसा, मिसळ आणि थाळी यांसारख्या पदार्थांचे दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला
व्यावसायिक गॅसचा दर आवाक्याबाहेर
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढल्या आहेत. वडापाव तळण्यासाठी लागणारे तेल, नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. जून २०२५ मध्ये सुमारे १४५० रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती गेल्या काही महिन्यांत लक्षणीय वाढल्या आहेत. वडापाव तळण्यासाठी लागणारे तेल,

नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. जून २०२५ मध्ये सुमारे १४५० रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलिंडर बेसनाचे पीठ आणि बटाट्याचे दर आधीच कडाडलेले असताना, आता गॅसच्या दरवाढीने विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे.

आता दुप्पटीहून अधिक दराने ३१०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांच्या नफ्यावर मोठा परिणाम झाला असून, अनेकांना व्यवसाय टिकवणे कठीण जात आहे. सामान्य ग्राहकांनाही या दरवाढीचा फटका बसत असून, बाहेर खाण्याचा खर्च वाढल्याने बजेट कोलमडत असल्याचे चित्र आहे.

खाद्यतेल, भाजीपाला आणि गॅसच्या वाढत्या दरांमुळे व्यवसाय चालवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. ग्राहकांना दरवाढ मान्य नाही आणि खर्च मात्र सतत वाढतोय. त्यामुळे आम्ही मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलो आहोत.
– अभिषेक पपुले, खाद्य व्यावसायिक,

वडापाव हा विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी परवडणारा नाश्ता मानला जायचा. मात्र आता वाढलेल्या दरांमुळे रोजच्या खर्चाचे गणित बिघडत आहे.

ग्राहक

Spread the love

Leave a Reply