पुणे: आईच्या सन्मानासाठी धम्मक्रांती बुद्ध विहारात विशेष कार्यक्रम संपन्न

IMG-20260515-WA0004

पुणे : मातृदिनानिमित्त धम्मक्रांती बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेला विशेष उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात परिसरातील शेकडो माताभगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद आणि एकोप्याचा अनोखा संदेश दिला.

कार्यक्रमादरम्यान लहान मुलांनी आपल्या आईबद्दलच्या भावना मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केल्या. छोट्या छोट्या मुलांनी आईच्या प्रेम, त्याग आणि मायेबद्दल व्यक्त केलेल्या भावना ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. या प्रसंगी निखळ प्रेम आणि कृतज्ञतेचे भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

मातांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्ची, बकेट बॉल, खो-खो आदी खेळांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेत मनमुराद आनंद लुटला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक ऐक्य, संस्कार आणि आनंद यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.

यावेळी आयोजकांनी धम्मक्रांती बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून समाज एकजुटीचे आणि बुद्ध विचारांच्या प्रसाराचे केंद्र असल्याचे सांगितले. आगामी काळातही अशा विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Spread the love

You may have missed