वारजे-गणेशपुरीत पथदिवे बंद; अंधारात सापाचा धोका, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

पुणे : वारजे- गणेशपुरी परिसरातील मुख्य रस्त्यापासून पृथक बराटे हॉस्पिटल परिसरापर्यंतच्या अंतर्गत गल्ल्यांमधील पथदिवे गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी या परिसरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
या परिसरालगत वनउद्यान असल्याने अधूनमधून साप रस्त्यावर तसेच रहिवासी भागात येत असल्याचे नागरिक सांगतात. नुकतेच पृथक बराटे हॉस्पिटल परिसरातील एका सोसायटीत घोणस साप आढळल्याची घटना घडली. सुदैवाने नागरिकांच्या वेळीच निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली.
मात्र पथदिवे बंद असताना रात्रीच्या अंधारात साप किंवा इतर धोकादायक प्राणी दिसणे कठीण होऊ शकते. त्यामुळे भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे.
बंद पथदिवे तातडीने सुरू करण्यासोबतच त्यांची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४