सिंहगड रोड, लगडमळ्यात RMC प्लांटच्या चिखलाचा त्रास; रस्ता स्वच्छतेपलीकडे कारवाई होणार का?

0
FB_IMG_1786368660191

पुणे : सिंहगड रोडवरील लगडमळा परिसरात RMC प्लांटमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल येत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे. चिखलामुळे रस्त्यावर घसरडेपणा निर्माण होऊन वाहतुकीसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होत आहे.

या समस्येची दखल घेत महानगरपालिकेकडून आज रस्त्याची स्वच्छता करण्यात येत आहे. मात्र, रस्ता आज स्वच्छ होईल; पण RMC प्लांटमधून पुन्हा चिखल रस्त्यावर आला तर पुढे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

वारंवार रस्ता स्वच्छ करण्यापेक्षा रस्त्यावर चिखल येण्याचे मूळ कारण थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित RMC प्लांटची पाहणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाई करावी, तसेच प्लांटमधून चिखल रस्त्यावर येणार नाही यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम केवळ तात्पुरती ठरू नये. आज चिखल साफ झाला, उद्या पुन्हा तोच चिखल रस्त्यावर आला, तर समस्या सुटली असे म्हणायचे कसे?

नागरिकांची सुरक्षितता आणि परिसराची स्वच्छता लक्षात घेता प्रशासनाने केवळ रस्ता स्वच्छ करण्यावर न थांबता चिखल निर्माण होण्याचे आणि रस्त्यावर येण्याचे मूळ कारण रोखून कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.

आता प्रशासन या प्रकरणी केवळ स्वच्छतेची कारवाई करणार की चिखलाला कारणीभूत ठरणाऱ्या व्यवस्थेवरही ठोस कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com⁠�
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply