कर्वेनगरमध्ये वनदेवी मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावरील चेंबरचे झाकण खचले; दुरुस्तीची गरज
Oplus_16908288
पुणे | कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनी : प्रभाग क्रमांक ३० मधील वनदेवी मंदिरासमोरील सिग्नलजवळ मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मैला वाहिनीच्या चेंबरचे झाकण खचल्याने वाहनचालकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
चेंबरचे झाकण रस्त्याच्या पातळीपेक्षा खचल्यामुळे या ठिकाणी वाहनांची चाके अडकण्याची किंवा वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही बाब अधिक काळजीची ठरत असून, सिग्नलजवळ वाहनांची वर्दळ लक्षात घेता अचानक वाहनाचा तोल जाण्याचा धोका नाकारता येत नाही.
या ठिकाणी निर्माण झालेल्या खचलेल्या भागात पावसाचे पाणी साचत नसले तरी रस्त्याच्या मध्यभागी असलेले खोलगट व असमतल चेंबरचे झाकण वाहनांसाठी अडथळा ठरत आहे. रात्रीच्या वेळी किंवा वाहतुकीच्या गर्दीत हा भाग वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास परिस्थिती अधिक धोकादायक होऊ शकते.
चेंबरचे झाकण खचल्यामुळे वाहनांना धक्का बसणे, वाहनाचा तोल जाणे किंवा अचानक वळण घेण्याची वेळ येणे यामुळे संभाव्य अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित विभागाने घटनास्थळी पाहणी करून चेंबरचे खचलेले झाकण तातडीने दुरुस्त करावे, ते मुख्य रस्त्याच्या पातळीशी समांतर करावे आणि वाहनचालकांसाठी हा अडथळा दूर करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे


— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४