विश्रांतवाडी: धम्मक्रांती बुद्ध विहारात माता रमाईंच्या स्मृतींना अभिवादन

0
IMG-20260530-WA0030

भीमनगर, प्रतिनिधी: धम्मक्रांती बुद्ध विहार, भीमनगर येथे माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माता रमाईंच्या संघर्षमय आणि त्यागमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी व्याख्याते विक्रम पाटोळे यांनी माता रमाईंच्या जीवनप्रवासाचा प्रेरणादायी आलेख उपस्थितांसमोर उलगडून दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात माता रमाई यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाचे त्यांनी प्रभावी शब्दांत विवेचन केले. त्यांच्या संघर्षमय आयुष्याचे उदाहरण देत समाजाने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात ज्ञानदानाचा उपक्रम राबवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जाती व्यवस्थेचे निर्मूलन’ या क्रांतिकारी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचा पंचशील उपरणे, पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन विकास पारडे आणि सुरज उजगरे यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला.

या प्रसंगी समता महिला मंडळ, धम्मक्रांती प्रतिष्ठान, भीमराज ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माता रमाईंच्या विचारांचा जागर करत सामाजिक बांधिलकी जपणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Spread the love

Leave a Reply