पुणे: वाकडेवाडी एसटी स्टँडवर नागरिकांची गैरसोय, वाहतूक व्यवस्थेचा अभाव; वाहतूक सुधारणा नाही, मात्र चिरीमिरी घेण्याचा खेळ सुरू

पुणे: नव्याने वाकडेवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या एसटी स्टँडवर वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एसटी स्टँड परिसरात वाहतूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे.
वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रस्त्यावर सतत गोंधळाचे वातावरण असते. प्रवाशांना वेळेत एसटी गाठणे कठीण झाले आहे. विशेषतः पिक अवर्समध्ये वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो आहे.
पहा व्हिडिओ

आश्चर्याची बाब म्हणजे या परिसराच्या थोड्या अंतरावर असलेल्या चौकात काही वाहतूक कर्मचारी मात्र चिरीमिरी घेताना दिसून येतात. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या कर्मचार्यांचे लक्ष वाहतूक सुधारण्याऐवजी दुसऱ्याच गोष्टींवर केंद्रित असल्याचे स्पष्ट होते.
वाहतूक विभाग आणि प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी केली आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाअभावी नागरिकांच्या समस्या वाढत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.