पुणे: ई टीव्ही भारतचे बातमीदार सज्जाद सय्यद आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित – व्हिडिओ

IMG-20250108-WA0009.jpg

पुणे : 8 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या विसाव्या वाढदिवशी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले. त्यांच्या स्मरणार्थ 6 जानेवारी हा दिवस राज्यभर ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.

यंदा पत्रकार दिनानिमित्त, ‘ई टीव्ही भारत’चे पुण्याचे बातमीदार सज्जाद सय्यद यांना प्रतिष्ठित आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे दिला जाणारा हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते किरण माने आणि एका वृत्तवाहिनीच्या संपादकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पहा व्हिडिओ


परिसंवाद आणि चर्चासत्राचे आयोजन

निगडी येथे आयोजित या सोहळ्यात ‘महाराष्ट्रातील माध्यमांची दशा आणि दिशा’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात राज्यभरातील विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनींच्या संपादकांनी भाग घेतला. पत्रकारितेच्या सध्याच्या आव्हानांवर व आगामी दिशांवर विस्तृत चर्चा झाली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गेल्या तीन वर्षांपासून राज्यभरातील उल्लेखनीय पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानित करत आहे. यंदाचा सोहळा पत्रकारितेच्या महत्त्वावर चर्चा घडवून आणणारा ठरला.

Spread the love