पुणे शहर: पुण्यात हातात बंदूक घेऊन गाडीवरुन इतरांना धमकावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर # दोघांविरुद्ध गुन्हा दाख

पुणे : दिवाळीच्या उत्साहात बंदुकीचा वापर; भर रस्त्यात दहशत माजवल्याचा प्रकार
पुणे : दिवाळीच्या सणात फटाके फोडण्यासाठी वापरण्यात येणारी बंदूक घेऊन भर रस्त्यात दहशत माजविण्याचा प्रकार समोर आला आहे. वडगाव पूल ते वारजे पूल दरम्यान शुक्रवारी (ता. १) या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
पहा व्हिडिओ
या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अक्षय अंकुश गायकवाड (वय २७, रा. शिवणे, उत्तम नगर) आणि सुनील चंद्रकांत शिंदे (वय २८, रा. वारजे) हे व्यवसायाने पेंटर असून, दोघे शुक्रवारी दुचाकीवरून भरधाव निघाले असताना बंदूक हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील शस्त्र फटाके फोडण्यासाठी वापरण्यात येणारी बंदूक असल्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केले.