“पुण्यात निवडणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्याचा हत्येचा धक्कादायक प्रकार”

IMG_20241102_134532.jpg

पुणे : दिवाळीच्या सणाच्या काळात आणि निवडणुकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पवन मावळ विभागात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी निलेश कडू यांची अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाचीवाडी महागाव हद्दीत ही घटना घडली. गुरुवारी (दि. 31) रात्री निलेश कडू यांचा खून करण्यात आला असून शुक्रवारी (दि. 1) सकाळी सुमारे सात वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ आणि पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे करत असून, लवकरच खुनातील आरोपींना अटक करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Spread the love

You may have missed