वारजेतील खान वस्तीमध्ये ड्रेनेज चेंबरची दुरवस्था; तक्रारी करूनही दुरुस्ती रखडली..!

0
IMG_20260929_155153

Oplus_16908288

पुणे | वारजे | २९ सप्टेंबर २०२६ : वारजे परिसरातील खान वस्तीमध्ये चौकोनी ड्रेनेज चेंबरची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली असून, संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही अंतर्गत गल्ल्यांमधील चेंबरचीही अशीच अवस्था असल्याचे सांगितले जात आहे.
खराब चेंबरमुळे पादचारी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर देखभाल-दुरुस्तीच्या कामांवर लाखो रुपये खर्च होत असताना, वस्ती भागातील मूलभूत सुविधांची कामे महिनोमहिने प्रलंबित का राहतात? तक्रारी करूनही दुरुस्तीला विलंब का? खराब चेंबरची नियमित पाहणी केली जाते का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
संबंधित विभागाने खान वस्ती व परिसरातील खराब ड्रेनेज चेंबरची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed