महापालिकेची जाहिरात धोरण बंद; अनधिकृत फलक जप्त करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी; क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधा

Hoardings-1-e1689510183250.jpg

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत फलकांवर बंदी; तक्रारीसाठी महापालिकेचे विशेष उपाय

पिंपरी-चिंचवड – शहरात अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स आणि किऑस्क लावण्यावर महापालिकेने कठोर बंदी घातली असून, अशा जाहिराती आढळून आल्यास तक्रारीसाठी थेट महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनधिकृत जाहिरातींवर कारवाईचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम २४४, २४५ तसेच जाहिरात व फलक नियंत्रण नियम, २००३ च्या तरतुदींनुसार महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊनच जाहिरात फलक लावण्याची मुभा होती. मात्र, एका जागेची परवानगी घेत शेकडो ठिकाणी फलक लावल्यामुळे शहर विद्रुप होत असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून महापालिकेने जाहिरात धोरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनधिकृत फलकांवर होणार तातडीने कारवाई
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांचे पथक अशा फलकांवर तातडीने कारवाई करणार असून, अनधिकृत फलक जप्त करण्यात येतील, असे महापालिकेचे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी स्पष्ट केले.

तक्रारीसाठी विशेष संपर्क क्रमांक
शहरात कुठेही अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर, पोस्टर्स अथवा किऑस्क आढळल्यास खालील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधता येईल:

उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल – ७३८५७७०५०१

शीतल वाकडे (अ क्षेत्रीय अधिकारी) – ९४२२३२०६९७

अमित पंडीत (ब क्षेत्रीय अधिकारी) – ९८९००१९२३२

अजिंक्य येळे (क क्षेत्रीय अधिकारी) – ९९२३१२६६२६

सुचिता पानसरे (ड क्षेत्रीय अधिकारी) – ७०८३५६९४१८

नाना मोरे (ई क्षेत्रीय अधिकारी) – ९५५२५९८४७२

श्रीकांत कोळप (फ क्षेत्रीय अधिकारी) – ९९२२५०२४०५

किशोर ननवरे (ग क्षेत्रीय अधिकारी) – ७२०८३१६०६०

महेश वाघमोडे (ह क्षेत्रीय अधिकारी) – ९८५०८६४७४३

शहर विद्रुपीकरण थांबवण्याचा निर्णय
महापालिकेच्या परवानगीविना वाढदिवस, अभिनंदन, श्रद्धांजली किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील जाहिरात फलक लावण्यास शहरभर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे सौंदर्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे.

Spread the love