मैंदर्गी: मालनबी शेख यांची मैंदर्गी महिला काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड

मैंदर्गी, ता. ३१ (प्रतिनिधी) – मैंदर्गी महिला काँग्रेस शहराध्यक्षपदी मालनबी शेख यांची निवड करण्यात आली आहे. महिला तालुका अध्यक्ष शितल ताई म्हेत्रे यांच्या हस्ते शेख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या वेळी शितल ताई म्हेत्रे, संगिता हिरतोट, सावित्री सावळी यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. मालनबी शेख यांच्या निवडीमुळे मैंदर्गीतील महिला कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.