शहर पोलीस दलात मोठा फेरबदल: १८ निरीक्षकांच्या बदल्या, काहींना बढती तर काहींना नवी जबाबदारी

पुणे: शहरातील प्रशासकीय फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. मुख्यतः गुन्हे निरीक्षक स्तरावर या बदल्या करण्यात आल्या असून, विविध पोलीस ठाण्यांमध्ये अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
या बदल्यांमध्ये बाणेर पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक नवनाथ जगताप यांची बाणेर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. तसेच, इतर १७ निरीक्षकांच्या देखील नव्या ठिकाणी नियुक्त्या झाल्या आहेत.
बदली झालेले पोलीस निरीक्षक व नवीन नियुक्ती:
नवनाथ जगताप – (गुन्हे, बाणेर) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर
शर्मिला सुतार – (गुन्हे, खडक) ते समर्थ पोलीस ठाणे
संगीता देवकाते – (गुन्हे, भारती विद्यापीठ) ते सायबर पोलीस ठाणे
अजित गावीत – (गुन्हे, पर्वती) ते नियंत्रण कक्ष
अनिल माने – (गुन्हे, चंदननगर) ते अलंकार पोलीस ठाणे
गुरुदत्त मोरे – (गुन्हे, विशेष शाखा) ते नांदेड सिटी पोलीस ठाणे
विकास भारमळ – (गुन्हे शाखा) ते स्वारगेट पोलीस ठाणे
रंगराव पवार – (गुन्हे शाखा) ते बाणेर पोलीस ठाणे
राजेश खांडे – (वाहतूक शाखा) ते फुरसुंगी पोलीस ठाणे
राघवेंद्रसिंह क्षीरसागर – (नियंत्रण कक्ष) ते पोलीस कल्याण
मनोज शेडगे – (नियंत्रण कक्ष) ते कोर्ट कंपनी
स्वाती खेडकर – (गुन्हे, येरवडा) ते चंदननगर पोलीस ठाणे
सुरज बेंद्रे – (गुन्हे, कोंढवा) ते बिबवेवाडी पोलीस ठाणे
अमर काळंगे – (गुन्हे, हडपसर) ते काळेपडळ पोलीस ठाणे
रजनी सरवदे – (वाहतूक शाखा) ते विशेष शाखा
आशालता खापरे – (विशेष शाखा) ते विमानतळ पोलीस ठाणे
सुरेखा चव्हाण – (गुन्हे, अलंकार) ते सहकारनगर पोलीस ठाणे
हर्षवर्धन गाडे – (वाहतूक शाखा) ते नियंत्रण कक्ष
प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे अधिकृत आदेशात नमूद करण्यात आले आहे. पोलिस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने हे फेरबदल करण्यात आले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.