पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार, पाहा वेळापत्रक

पुणे| पुणेकरांना आता पाणी जपून वापरणे अत्यावश्यक ठरणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय ५ मे, सोमवारपासून लागू होणार असून, विविध भागांमध्ये वेगवेगळ्या दिवशी पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Water Cut Shedule)
सोमवारी बालाजीनगर, कात्रज (चौधरी गोठा, गुजर वस्ती), कोंढवा (सावंत कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी) येथे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मंगळवारी सनसिटी, जुनी धायरी, कात्रज (राजस सोसायटी), कोंढवा (हब टाऊन, कामठे पाटील नगर) या भागात कपात केली जाईल. (Pune Water Cut Shedule)
बुधवारी वडगाव हिंगणे, भांडेआळी, बलकवडे नगर, आणि स्वामी समर्थ नगर (कोंढवा रस्ता) भागात पाणी नसेल.
गुरुवारी धनकवडी, सहकारनगर भाग 1, कात्रज (मॅजेस्टीक टॉवर, सुखसागरनगर), कोंढवा (गोकुळनगर, शिवशंभो नगर) येथे पाणी बंद राहील.
शुक्रवारी आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ मागील परिसर, जांभुळवाडी रस्ता, कोंढवा बु. व कपिलनगर भागात पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल.
शनिवारी कात्रज गाव, गुजरवाडी, अशरफ नगर, चैत्रबन वसाहत या भागांतील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
रविवारी महादेवनगर, आनंदनगर, आंबेडकर नगर, पारगेनगर व पुण्यधाम परिसरातील नागरिकांना पाणीकपातीचा फटका बसणार आहे. संपूर्ण शहरभर या निर्णयाचा परिणाम दिसून येणार असल्याने नागरिकांनी योग्य नियोजन करून पाणी वापरावे, असे आवाहन PMC ने केले आहे.