पुण्यात पाणीपुरवठ्यास विलंब; दुपारी १ ते २ दरम्यानच नळांना पाणी

0
pudharinews_2025-03-08_t5jolqo7_12-1.jpg

पुणे, प्रतिनिधी : खडकवासला धरणातून पद्मावती पंपिंग स्टेशनकडे येणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याने पुणे शहरातील पाणीपुरवठा शुक्रवारी उशिरा होत आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारी सुमारे १ ते २ वाजेच्या दरम्यानच पाणी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली.

महापालिकेने नागरिकांना परिस्थितीची नोंद घेऊन आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत, पंपिंग व स्थापत्य विषयक तातडीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या मीटर बसविण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा सुरू होण्यास आणखी विलंब झाला आहे.

नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply