जागतिक आदिवासी दिन व वीर एकलव्य जयंती उत्साहात
थेऊर : श्री क्षेत्र थेऊर येथे नवनाथ तरुण मंडळ झांज पथकाच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस तसेच वीर एकलव्य, बिरसा मुंडा, तंट्या भिल, राघोजी भांगरे व शबरी माता जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान आदिवासी समाजातील महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. सामाजिक एकता, समाजाची प्रगती, शिक्षणाचे महत्त्व तसेच महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांनी समाज मंदिराच्या बांधकामासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज नाना काकडे यांनीही समाज मंदिरासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला श्री योगेश भाऊ सूर्यवंशी, एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य तसेच श्री शिवदास भाऊ पवार, एकलव्य जनता दल संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संतोष दादा काकडे, परिसरातील नागरिक, समाजबांधव आणि नवनाथ तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनाथ तरुण मंडळाच्या झांज पथकाने सादरीकरण करत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. उत्सवाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील महापुरुषांचे योगदान आणि त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.