वारजे दत्तनगर कॅनॉल रोडवर धोक्याची चाहूल..🚨 छोटा खड्डा, आत मोठी पोकळी!
पुणे : वारजे सह्याद्री शाळा, दत्तनगर कॅनॉल रोडवरील इंडस्ट्रियल सोसायटी कॉर्नरजवळ रस्त्यावर छोटा खड्डा पडला आहे. मात्र, या छोट्या खड्ड्यातून रस्त्याच्या आतील भागात मोठी पोकळी असल्याचे दिसून येत आहे.
वरून खड्डा छोटा दिसत असला तरी रस्त्याखालची पोकळी वाढत गेल्यास संपूर्ण रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने भविष्यात गंभीर अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही.
मोठा खड्डा पडून दुर्घटना घडण्याची वाट पाहायची की, धोका निर्माण होताच त्यावर उपाययोजना करायची? महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून रस्त्याखालील परिस्थिती तपासावी आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
⚠️ आज छोटा खड्डा दिसतोय; उद्या याच ठिकाणी मोठे भगदाड पडू नये, यासाठी प्रशासन जागे होणार का?
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४