उघडे चेंबर, धोक्यात नागरिकांचे जीव; जबाबदार कोण?
उंड्री–NIBM रोडवरील उघड्या चेंबरमुळे एका वृद्ध महिलेचा तोल जाऊन त्या चेंबरमध्ये पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने त्या गंभीर जखमी होण्यापासून थोडक्यात बचावल्या. या घटनेमुळे शहरातील नागरी देखभालीतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
याच परिसरात यापूर्वीही एका रिक्षाचे चाक उघड्या चेंबरमध्ये अडकल्याची घटना घडली होती. वारंवार अशा घटना घडत असूनही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे की, “महापालिका कारवाई करण्यापूर्वी अजून किती अपघात होणार?”
त्यांनी शहरातील सर्व धोकादायक रस्ते व उघडी चेंबर्स तातडीने सुरक्षित करण्याची, निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४