उंड्री–एनआयबीएम रोडवरील उघड्या चेंबरमुळे वृद्ध महिला पडल्या; पुणे महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना टळली, पण याची जबाबदारी कोण घेणार?
उंड्री–एनआयबीएम रोडवर रस्त्यातील चेंबरचे झाकण गायब असल्याने एका वृद्ध महिला त्यात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, त्या पूर्णपणे चेंबरमध्ये पडल्या असत्या तर गंभीर अनर्थ घडला असता तर?
शहरातील रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना नागरिकांच्या जीवाशी खेळणारी अशी उघडी चेंबर्स का कायम आहेत? अशा धोकादायक ठिकाणांची वेळेवर पाहणी आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?
या घटनेनंतर पुणे महानगरपालिकेच्या रस्ते देखभालीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आणखी एखादा निष्पाप नागरिक बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उघडी चेंबर्स व इतर धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४