सिंहगड रोडवरील उघड्या चेंबरमुळे अपघाताचा धोका कायम; वाहनाचे मोठे नुकसान

0
IMG_20260806_14082446

सिंहगड रोडवरील ब्रह्मा हॉटेल चौक परिसरात मुख्य रस्त्यावरील उघड्या व धोकादायक चेंबरमुळे पुन्हा एकदा गंभीर सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत एका कारचे उघड्या चेंबरवर आदळल्याने इंजिनचे मोठे नुकसान झाले. धडकेमुळे इंजिन ऑइल रस्त्यावर सांडले आणि काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या धोकादायक चेंबरबाबत संबंधित प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर तात्काळ दुरुस्ती करण्याची, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची आणि नुकसानग्रस्त वाहनधारकाला नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
याशिवाय सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील अनेक रस्त्यांवर खड्डे, उघडी किंवा खचलेली चेंबर्स आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या कायम असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com⁠�
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply