येरवडा मनोरुग्णालयात रुग्ण कल्याण समितीत,आमदार प्रतिनिधी म्हणून हर्षद जाधव यांची नियुक्ती
पुणे : प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथे रुग्णांच्या सुविधा व व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी रुग्ण कल्याण समिती (नियामक समिती) पुन्हा गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात स्थानिक आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिलेल्या पत्रानुसार समितीत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून श्री. हर्षद मधुकर जाधव यांचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित नाव समितीत समाविष्ट करण्यात आले आहे.
रुग्ण कल्याण समिती ही रुग्णालयातील सेवा, सुविधा आणि प्रशासन यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. नव्याने गठित करण्यात आलेली ही समिती रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने विविध निर्णय घेणार असून, रुग्णसेवा अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथे गठित करण्यात आलेल्या या समितीमुळे रुग्णालयाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.