लाल रंगाचं टरबूज खाताय? वेळीच व्हा सावधान, केमिकलचा होतोय वापर

n65419290217409112690583a418aeacccccb2d98b4c9a8e45cf841754268b90daa8aad37ab1b5cf5ef76e0.jpg

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशावेळी शीत गुणधर्म असलेले टरबूज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लालेलाल दिसणारे टरबूज बघून तेच खरेदी करण्याचा ग्राहकांना मोह आवरत नाही

मात्र ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लाल रंगासाठी कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. हा रंग आरोग्यासाठी घातक ठरण्याची भीती असून यामुळे टरबूज खरेदी करताना ग्राहकांनी काळजी घेतली पाहिजे.

चौका चौकात टरबूजाची दुकाने थाटलीचे पाहायला मिळत आहे. ग्राहक लालेला दिसणाऱ्या टरबूजला पसंती देतात यामुळे काहींनी त्यावर कृत्रिम रंगाचा पर्याय शोधून काढलाय. याशिवाय इंजेक्शन देऊन टरबूजला पिकविले जाते. टरबूजात शीत गुणधर्म असला तरी आरोग्य जपण्यासाठी खात्री करूनच खरेदी करायला हवे, अन्यथा आरोग्याला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृत्रिम रंगापासून पिकविलेल्या फळांचा वापर करत असाल तर किडनीवर परिणाम होतो. पोटात अल्सर निर्माण होण्याच्याही धोका, शरीरात हलकेपणा किंवा जडपणा जाणवण्याचा धोका आहे. केमिकल पोटात गेल्यानंतर त्याचा वितरित परिणाम होतो.

कापून ठेवलेल्या टरबुजाच्या फोडी लाल भडक दिसतात अनेकदा इंजेक्शन देऊन टरबूज पिकवले जाते. खात्री करण्यासाठी ग्राहकांना कापुनही दाखवले जाते कापून असलेले टरबूज खरेदी करण्याचे टाळावे. अशाप्रकारचे टरबूज खरेदी करताना काळजी घेणं गरजेचे आहे. कारण खरेदी केलेले टरबूज पिकलेले असल्याचे वाटते मात्र ते कृत्रिमरीत्या पिकवल्या जाते. कापल्यानंतर बिया कवळ्या निघतात यात ग्राहकांची फसवणूक होते यामुळे बाजारात खात्री करूनच ग्राहकांनी टरबूज खरेदी केले पाहिजे.

टरबुजाचा रंग लालभडक दिसत असेल तर त्याच्या फोडी करून त्या पाण्यात टाकाव्यात त्या फोडीचा रंग पाण्यात विरघळल्यास त्या टरबुजाला कृत्रिम केमिकलचा वापर करून पिकवले असल्याची शक्यता अधिक असते. टरबुजाचा बाहेर रंग हिरवा असतो मात्र काही वेळ पूर्ण पिवळ्या रंगाची टरबूज दिसते सध्या फळांमध्ये आकर्षणपणा आणण्यासाठी सर्रासपणे कृत्रिम रसायनचा वापर केल्या जातो फळे लवकर टिकवण्यासाठी इंजेक्शन ही दिले जाते नफा कमवण्यासाठी विक्रेत्यांकडून नामी शक्कल लढवल्या जाते. यामुळे मात्र विश्वासाने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या विषयाला विश्वासाला तडा जातो.

Spread the love

You may have missed