पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयतीनिमित्त पुण्यात वाहतूकीत बदल; कोणते मार्ग बंद, कोणते सुरू? वाचा सविस्तर

पुणे (Pune) शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2025) वाहतूक निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये काही रस्ते बंद असतील तर काही ठिकाणी वाहतूक वळवली जाईल. हे बदल प्रामुख्याने पुणे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, विश्रांतवाडी, दांडेकर पुल आणि पुणे कॅम्पमधील अरोरा टॉवर्स चौक परिसरात असतील. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्य मेळावे होतील. माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून हे निर्बंध लागू असतील.
सोमवार, दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने समाजातील सर्व स्तरातील नागरीक पुणे शहर व बाहेर गावाहून मोठया प्रमाणात मिरवणूकीने व निरनिराळे वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन येथील पुतळा, अरोरा टॉवर चौकातील पुतळा, विश्रांतवाडी चौक ते कळस फाटा व कळसफाटा ते विश्रांतवाडी चौक परिसरात येत असतात. सदर मिरवणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचे दोन्ही बाजूस गर्दी होत असते, त्यामुळे सदर ठिकाणांवर वाहन चालकांची गैरसोय होऊ नये व वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे राहणे करिता आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे बदल करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर:
शाहिर अमर शेख चौक- शाहिर अमर शेख चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहिर अमर शेख चौकातून वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- शाहिर अमर चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहने आरटीओ चौक जहांगीर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
आ.टी.ओ. चौक- आर.टी.ओ चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतुक वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- आर.टी.ओ चौकाकडून सरळ जहांगीर चौकमार्गे इच्छित स्थळी जातील व शाहीर अमर शेख चौकातून कुंभारवेस मार्गे इच्छित स्थळी जातील.
जीपीओ चौक- जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळविण्यात येत आहे.