पूणे: येरवडा येथे गुन्हेगारी टोळीवर कारवाई; तीन जण अटकेत, इतरांचा शोध सुरू – व्हिडिओ

IMG_20250211_005313.jpg

पुणे, दि. ११ फेब्रुवारी – येरवडा पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हेगारी कृत्यात सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध सुरू असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांचा तपासही सुरू आहे.

येरवडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 19/2025 अन्वये कलम 189(2), 190, 223, 281 भारतीय दंड संहिता तसेच क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट 135 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अटक आरोपींमध्ये प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे (वय 26, रा. भीम ज्योत मंडळ, येरवडा), प्रथमेश संजय राठोड (वय 21, रा. कामराज नगर, येरवडा) आणि बाबा भानुदास गवळी (वय 30, रा. भीम ज्योत मंडळ, येरवडा) यांचा समावेश आहे.

पहा व्हिडिओ

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिस्थितीची पडताळणी केली. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांची माहिती घेतली जात आहे.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Spread the love

You may have missed