पुणे: रामवाडीत आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये महिला वर कोयत्याने हल्ला; सहकारी आरोपी अटकेत

n6460959721735969270157e6bca6deb3385d1545cd3792ff9304e07ae574689e5498f34978d38f33ab0141.jpg

पुणे : रामवाडी परिसरातील WNS ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीच्या पार्किंगमधील गंभीर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आज सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता एका २८ वर्षीय महिलेला धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी करण्यात आले.

ही घटना येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलीस निरीक्षक रवींद्र शेलके यांनी याबाबत माहिती दिली आहे. पीडित महिला कात्रज येथे राहत असून, तिच्यावर शिवाजीनगर येथे राहणाऱ्या ३० वर्षीय कृष्णा सत्यनारायण कनोजा याने हल्ला केला आहे.

हल्ल्याचे कारण जुन्या वादातून निर्माण झालेली वैमनस्यता असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. हल्ल्यात महिलेला उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, तिला तत्काळ येरवड्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संशयित आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Spread the love

You may have missed