गुरुवारी पुण्यातील काही भागात पाणी राहणार बंद

0

केदारेश्वर पंपिंग स्टेशन, कात्रज येथे मुख्य व्हॉल्व्ह आणि मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे गुरुवारी (ता. २६) दक्षिण पुण्यात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

शुक्रवारी (ता. २७) उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

पाणी पुरवठा खंडित होणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत:

बालाजी नगर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रस्ता, वरखडेनगर, ओम्कार, भूषण सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, राजस सोसायटी, कदम प्लाझा परिसर, सुखसागर नगर भाग १ आणि भाग २, आगममंदिर परिसर, संतोष नगर, अंजली नगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, मोरे बाग परिसर, चंद्रभागा नगर, भारती विद्यापीठ मागील परिसर, कात्रज कोंढवा रस्ता, शिवशंभो नगर, गोकुळनगर, साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, राजीव गांधी नगर आणि सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रूक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगे नगर, खडी मशीन परिसर, बधेनगर, येवलेवाडी, कामठे – पाटील नगर परिसर.

वरील भागांमध्ये नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करून नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed