गणपती विसर्जन सोहळ्यात अल-हिफाजत केटरर्सकडून ५ हजार पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वितरण

0
IMG_20260927_010049

येरवडा : महाराष्ट्र माझा न्युज- गणपती विसर्जन सोहळ्यानिमित्त शास्त्रीनगर चौक येथे भाविक, गणेशभक्त आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी नागरिकांसाठी अल-हिफाजत केटरर्सच्या वतीने ५ हजार पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक शास्त्रीनगर चौक परिसरातून मार्गक्रमण करत होते. उन्हाचा तसेच गर्दीचा विचार करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

अल-हिफाजत केटरर्सच्या या उपक्रमामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी भाविकांना मोठा दिलासा मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

You may have missed