पक्षविरोधी कारवायांसाठी पुण्यात २५ शिवसैनिकांची हकालपट्टी; नगरातील प्रमुख कार्यकर्ते आणि सक्रिय नेते यांचा समावेश

127047242_whatsappimage2022-10-11at7.11.24pm.jpg.webp

पुणे, दि. १३ (प्रतिनिधी) – पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून पुण्यातील २५ जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून जारी केलेल्या पत्रकात हकालपट्टीची माहिती देण्यात आली आहे. पत्रकात म्हटले आहे की, पक्षाच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली असून पक्षातील अनुशासन कायम ठेवणे हे उद्देश आहे.

हकालपट्टी झालेल्यांमध्ये नगरातील प्रमुख कार्यकर्ते आणि सक्रिय नेते यांचा समावेश आहे. हकालपट्टी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – नीलेश जठार, शशिकांत उल्हास साटोटे, सचिन रंगनाथ भगत, शैलेश (उर्फ पाला) दिलीप मोरे, प्रवीण डोंगरे, दत्तात्रय रामचंद्र पवार, अजय माणिक शिंदे, मयूर तुळशीराम भांडे, बाळासाहेब भांडे, महेश भीमराव सुतार, बाळासाहेब मनोहर धनवडे, जयदीप पडवळ, आनंद मंजाळकर, महेंद्र अर्जुन बनकर, अक्षय संजय भोसले, अनिल नारायण दामजी, जावेद खान, गौरी मुकुंद चव्हाण, मुकुंद चव्हाण, निरंजन बाळासाहेब दाभेकर, अशोक हरणावळ, सूरज लोखंडे, संदीप मते, सागर बारणे आणि गंगाधर बधे.

Spread the love

You may have missed