पुण्यात 15 दिवसांत 247 गुंडांच्या मुसक्या आवळल्या, क्राईम ब्रांचच्या अँटी गुंडा स्कॉडची मोठी कामगिरी

0
IMG_20261007_110024

पिंपरी-चिंचवड : फरार व पाहिजे आरोपींच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राबविलेल्या 15 दिवसांच्या ‘मिशन वॉन्टेड’ मोहिमेत तब्बल 247 आरोपींना अटक करण्यात आली. 27 जुलै ते 12 ऑगस्टदरम्यान राबविण्यात आलेल्या या कारवाईत पोलीस ठाण्यांनी 140, तर गुन्हे शाखेने 107 आरोपींना पकडले.

गुन्हे शाखेच्या अंतर्गत कामगिरीत अँटी गुंडा स्कॉडने 132 गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. पथकाने मोक्का, गंभीर तसेच इतर गुन्ह्यांतील एकूण 21 आरोपींना अटक केली. युनिट तीनने 103 गुणांसह दुसरे, तर युनिट एक व दोनने प्रत्येकी 84 गुणांसह संयुक्त तिसरे स्थान मिळविले.

या मोहिमेपूर्वी पोलिसांच्या रडारवर 2 हजार 667 आरोपी होते. विविध कारणांमुळे 79 प्रकरणे कमी झाल्याने आणि 247 आरोपी पकडल्याने एकूण 326 प्रकरणांचा निपटारा झाला असून, अद्याप 2 हजार 341 आरोपींचा शोध बाकी आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed