पुणे: अजितदादांच्या इशाऱ्यानंतर सीपी अॅक्शन मोडवर-सहा सहायक पोलीस आयुक्तांना दिले महत्वाचे विभाग

पुणे शहर पोलीस दलातील सहा साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव ही तात्पुरती नेमणूक करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेशात म्हटले आहे.
विठ्ठल दिगंबर दबडे (विशेष शाखा एक) ते खडकी विभाग, अनुजा अजित देशमाने (खडकी विभाग) ते फरासखाना विभाग अनुराधा विठ्ठल उदमले (विशेष शाखा दोन) ते हडपसर विभाग, नूतन विश्वनाथ पवार (फरासखाना विभाग) ते विशेष शाखा दोन, अतुलकुमार यशवंत नवगिरे (वाहतूक शाखा) ते विशेष शाखा एक, अश्विनी गणेश राख (हडपसर विभाग) ते वाहतूक शाखा अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
याबरोबरच १० साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक यांच्या त्यांच्या विनंतीनुसार अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.