पुणे: शासन दरांपेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या केंद्रांवर कारवाई होणार – तहसीलदारांचे आश्वासन; तक्रारी नोंदवा, कारवाई होईल – तहसीलदारचा शब्द

IMG_20250104_110407.jpg

पुणे – आंबेगाव तालुका व मंचर शहरातील काही महा-ई-सेवा केंद्रांकडून नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांनी केला आहे. या प्रकारांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी घोडेगाव येथील तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदन सादर केले.

तहसीलदार कार्यालयात झालेल्या या भेटीत भाजपचे कार्यकर्ते कालिदास गांजाळे, नवनाथ थोरात, व सुनीत थोरात यांचीही उपस्थिती होती. निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, आंबेगाव व मंचरमधील काही महा-ई-सेवा केंद्र नागरिकांसाठी चांगले कार्य करत आहेत, परंतु काही ठराविक केंद्र अवाजवी शुल्क आकारून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत.

सामान्य शुल्काच्या अनेक पटीने आकारणी
निवेदनात नमूद करण्यात आले की, ज्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 100 ते 200 रुपये खर्च होतो, तिथे काही केंद्र 1,000 ते 2,000 रुपये घेत आहेत. तसेच, या केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे अधिकृत दरपत्रक लावलेले नाही.

तहसीलदारांची कारवाईचे आश्वासन
तहसीलदार संजय नागटिळक यांनी नागरिकांकडून अधिकृत शुल्क आकारण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले. “सर्व केंद्रांना दरपत्रक लावण्यास सांगू. जर कोणी नियम मोडत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करू आणि गरज पडल्यास लायसन्सही रद्द करू,” असे नागटिळक यांनी सांगितले.

संजय थोरात यांनी तहसीलदारांच्या या निर्णयाचे स्वागत करत नागरिकांनीही अशी समस्या उद्भवल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Spread the love

You may have missed