अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून प्रसाद बसवराज बाबा नगरे यांची अपक्ष उमेदवारी जाहीर

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्रसाद बसवराज बाबा नगरे यांनी आमदार पदासाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. वळसंग येथील रहिवासी असलेल्या नगरे यांचे निवडणूक चिन्ह ‘ऑटो रिक्षा’ आहे. मतदारसंघातील मुलभूत समस्या आणि विकासावर लक्ष केंद्रित करून जनतेच्या सेवेसाठी त्यांनी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांच्या समस्या, शिक्षण, आरोग्य, आणि रोजगाराच्या संधींवर विशेष भर देत या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची त्यांनी भूमिका मांडली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रसाद बसवराज बाबा नगरे यांनी मतदारांच्या भेटीगाठींना प्रारंभ केला असून, घरोघरी जाऊन मतदारांच्या समस्या समजून घेण्यास आणि संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
त्यांच्या या कार्यशैलीमुळे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी असलेल्या भूमिकेमुळे स्थानिक जनतेत उत्साहाचे वातावरण आहे.