अक्कलकोटच्या सुपुत्रांचा हज यात्रेसाठी गौरव सोहळा

IMG-20250426-WA0012.jpg

अक्कलकोट, दुधनी : येथील सुपुत्र मोहम्मद गौस रफिक नदाफ (क्राईम ब्रांच, पिंपरी-चिंचवड) आणि मोहम्मद सैफ रफिक नदाफ (पोलीस दल, पुणे शहर) हे सन 2025 मध्ये पवित्र हज यात्रेसाठी जाणार असून, त्यानिमित्ताने त्यांचा गुलपोशी सत्कार करण्यात आला.

हा गौरवसोहळा अक्कलकोट येथील हजरत दाता शाह कादरी यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन अलाउद्दीन झळकी व आझम शेखजी हाजी मोहम्मद रफिक सैपनसाब नदाफ यांच्या वतीने करण्यात आले होते. या सोहळ्याला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला.

यावेळी संत सोपी दातापीर यांचाही सत्कार आजी रफिक नदाफ यांच्या हस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इरफान दावणा, हुसेन बळुर्गी, याकूब मौलाना, मेदिमिया जिडगे, इमामशा मकानदार, सलीम मौलाना, रियाज नदाफ, महमद बांगी, युसुफ नदाफ, बाबू मोमीन, अली जिडगे, मेहराज जीडगे, रफिक नदाफ आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी उपस्थितांनी हज यात्रेसाठी शुभेच्छा देत, सामाजिक ऐक्य व धार्मिक श्रद्धेचे दर्शन घडवले.

Spread the love