नऱ्हे परिसरात कचरा जाळला; घनकचरा व्यवस्थापनाचा कारभार ऐरणीवर
स्मशानभूमीकडील हायवे सर्व्हिस रस्त्यावर कचरा जाळण्याचा प्रकार; वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह
कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाटीवर नियमित देखरेख ठेवली जाते का? वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांची या परिसरातील स्वच्छतेबाबत नेमकी जबाबदारी काय? असे प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे धूर आणि वायुप्रदूषणाचा धोका निर्माण होऊ शकतो.
महापालिका प्रशासनाने संबंधित ठिकाणाची पाहणी करून घटनेची चौकशी करावी, कचरा जाळण्यास जबाबदार असणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.
नऱ्हेतील या प्रकाराची प्रशासन दखल घेणार का आणि कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४