कर्वेनगर कमिन्स कॉलेज रोडवर ‘केबलचा फास’; अपघाताची वाट पाहतंय प्रशासन?

0
IMG_20260824_17595212

कर्वेनगर, पुणे:२४ऑगस्ट:संध्याकाळच्या प्रचंड वाहतूक गर्दीत रस्त्यावर लोंबकळणारी केबल; प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?
कर्वेनगर कमिन्स कॉलेज रोडवर रस्त्याच्या दिशेने लोंबकळणारी केबल सध्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत आहे. अतिवर्दळीचा हा रस्ता असून सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची वर्दळ असते. विशेषतः संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी रस्त्यावर लोंबकळणारी ही केबल एखाद्या मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देणारी ठरू शकते.
या धोकादायक परिस्थितीचा व्हिडिओ समोर आला असून रस्त्यावर खाली आलेली केबल स्पष्टपणे दिसत आहे. वाहतुकीतून मार्ग काढताना एखाद्या दुचाकीस्वाराच्या अंगाला किंवा गळ्याला ही केबल अडकली, तर वाहनावरील नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. पादचारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याचा धोका संभवतो.
केबल कंपन्यांचा निष्काळजीपणा की प्रशासनाची डोळेझाक?
इंटरनेट, केबल टीव्ही आणि दूरसंचार सेवांसाठी रस्त्यांच्या कडेला व खांबांवर मोठ्या प्रमाणात केबल्स टाकल्या जातात. मात्र केबल खराब झाल्यानंतर किंवा वापरात नसताना ती व्यवस्थित हटविणे, तसेच लोंबकळणाऱ्या केबल्स सुरक्षित करणे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते.
अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होण्याआधीच धोकादायक केबल हटविणे गरजेचे आहे. कमिन्स कॉलेज रोडवरील या प्रकाराची पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाहणी करावी आणि संबंधित केबल सुरक्षितपणे हटवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
केबलसाठी जबाबदार असलेल्या संबंधित कंपनीची ओळख पटवून निष्काळजीपणाबद्दल जबाबदारी निश्चित होणार का? तसेच शहरातील इतर रस्त्यांवरील लोंबकळणाऱ्या केबल्सचीही पाहणी करून त्या हटविण्यासाठी प्रशासन मोहीम राबवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
अपघातानंतरची कारवाई’ नको; ‘अपघातापूर्वीची खबरदारी’ हवी!

Spread the love

Leave a Reply

You may have missed