निशुल्क LMV प्रशिक्षणासाठी अर्ज सुरू – आयडीटीआर पुणेची संधी

पुणे: इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आयडीटीआर), पुणे व प्रायोजक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हलक्या मोटार वाहन (LMV) प्रशिक्षणासाठी मोफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य दिले जाणार आहे.
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये:
कालावधी: ४५ दिवसांचे निवासी प्रशिक्षण
परवान्याची प्रक्रिया: LMV लायसन्स काढण्याची सर्व प्रक्रिया व शुल्क संस्थेकडून भरले जाईल.
निवास व भोजन: प्रशिक्षणार्थींना मोफत वसतिगृह, सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण आणि चहा पुरविण्यात येईल.
नियम व अटी:
प्रशिक्षण कालावधीत उपस्थिती अनिवार्य असून, रविवारी सुट्टी असेल.
प्रशिक्षण दररोज सकाळी ९:०० ते ५:३० वाजेपर्यंत चालेल.
नाईट ड्रायव्हिंगसाठी वेळ सायंकाळी ६:३० ते ८:३० असा असेल.
नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
पॅन कार्ड
लाईट बिल
५ पासपोर्ट साइज फोटो
वैयक्तिक माहिती असलेले बायोडाटा / रेझ्युमे
अर्ज करण्यासाठी संपर्क:
इच्छुक उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा –
श्री. बिराजदार – ९७६२३१२०२०
(ही एक उत्तम संधी असून, इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा.)