स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्यांकडूनच प्रदूषण! वारजे रामनगर–गणेशपरीत ठेकेदाराच्या झाडणकाम सेवकांकडून फटाक्यांचा कचरा जाळला

0
IMG_20261109_115024

Oplus_16908320

गणेशपरी सुप्रीम बेकरीच्या मागे

पुणे | ९ नोव्हेंबर २०२६

स्वच्छतेच्या नावाखाली प्रदूषणाचा प्रकार! वारजे येथील रामनगर–गणेशपरी परिसरात दिवाळीनंतर विविध ठिकाणी पडलेला फटाक्यांचा कचरा झाडून एकत्रित करण्यात आला. मात्र, या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी पुणे महापालिकेच्या झाडणकाम ठेकेदाराकडील सेवकांकडून तो जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

कचरा जाळल्यानंतर परिसरात धूर आणि दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे, तर जळालेल्या कचऱ्याची राख वाऱ्यामुळे परिसरात पसरत आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या प्रक्रियेतूनच प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे.

प्रदूषण रोखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?

शहरातील सार्वजनिक स्वच्छता राखण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडूनच कचरा जाळण्याचा प्रकार घडत असेल, तर संबंधित ठेकेदाराच्या कामावर देखरेख करणारी यंत्रणा नेमके काय करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. झाडणकाम सेवकांना कचरा संकलन आणि विल्हेवाटीबाबत योग्य सूचना दिल्या जातात का? संबंधित मुकादम, पर्यवेक्षक आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांचे नियंत्रण आहे का?

महापालिका प्रशासनाने या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून खुलासा मागवावा. परिसरातील राख व उर्वरित कचरा तातडीने उचलावा आणि जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

स्वच्छता करण्यासाठी नेमलेले कर्मचारीच कचरा जाळून प्रदूषण निर्माण करत असतील, तर महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेची जबाबदारी निश्चित करणार कोण? हा खरा प्रश्न आहे!

रामनगर, शिवाजी चौक
रामनगर, शिवाजी चौक
रामनगर, सुतार दवाखाना
रामनगर, बापुजी बुवा चौक
रामनगर, बापुजी बुवा चौक
रामनगर, बापुजी बुवा चौक
रामनगर, बापुजी बुवा चौक

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed